ताज्या बातम्यामहाराष्ट्र

करवीर तालुक्यात ऊसाच्या पाल्यावर चोरट्यांचा घाला!;  बागायतदार ऊस उत्पादक  शेतकरी चिंतातूर  

सावरवाडी ( प्रतिनिधी ) : 

करवीर तालुक्यात शेतीमध्ये उभ्या ऊसाचा पाला चोरून नेण्याच्या प्रकारामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर बनला आहे . ऊसाच्या पाल्यावर चोरट्या लोकांचा  घाला पडू लागला आहे .पाला चोरीमुळे ऊस पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ लागला .पाला चोरट्या लोकांच्यावर  कारवाई करण्याची मागणी बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे . 

                       

ऐन पावसाळा ऋतू ग्रामीण भागात शेतीतील उभ्या ऊस पिकाच्या पाला चोरीचे प्रकार घडत आहे . ऊसाचा पाला चोरून नेण्याचे प्रकार गावागावात घडू लागले आहे . सकाळी पहाटे व दुपारी ,संध्याकाळी , या वेळेत ऊसाचा पाला चोरीचे प्रकार घडतात . ऊसाचा पाला चोरीच्या प्रकाराबाबत चोर पकडण्यासाठी बागायतदार शेतात बसतात . .ऊसाचा पाला चोरट्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे . 

                       

दरम्यान ग्रामपंचायत , तंटामुक्त समिती यांनी ग्रामसभा घेऊन ऊसाचा पाला चोरट्यावर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला .

                     

ग्रामीण भागातील तंटामुक्त समितीचा भोंगळ कारभार असून त्याबरखास्त कराव्या अशी मागणी विविध जनसंघटनेतर्फ केली आहे . ग्रामीण भागात शेतजमिनी नसलेल्या  अथवा अल्पभूधारक लोकांच्या कडून  दुसऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन  ऊसा पिकाच्या पाला, केळीचे घड , नारळ , चोरून नेण्यात चोरट्याची टोळी कार्यरत झाली आहे . प्रकाराला आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे . 

भुमीहीन व्यक्ती, दुभती जनावरे मात्र पाच  

ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात भुमीहीन लोकांनी पाच पाच  दुभती जनावरे पाळल्याने वैरणीसाठी बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतीतील ऊस पाला चोरून नेला जातो त्यामुळे ऊसाचे  उत्पादन घटते . 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks