ताज्या बातम्यामहाराष्ट्र
म्हाळेवाडी येथील साहिल कांबळे निबंध स्पर्धेत प्रथम.

गडहिंग्लज प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
मराठी विज्ञान परिषद, गडहिंग्लज यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या.. *निबंध स्पर्धेत विद्यार्थी गट ( इ.१ ली ते १२ वी ) या गटामध्ये म्हाळेवाडी ता. चंदगड या गावचा सुपुत्र कु. साहिल सुनिल कांबळे इयत्ता ९ वी जागृती हायस्कूल गडहिंग्लज याच्या कोरोनापासून मी काय शिकलो या विषयावरील निबंधाचा गडहिंग्लज विभागामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे.
तसेच साहिलचा हा निबंध गडहिंग्लज विभागामार्फत राज्यस्तरावरील स्पर्धेच्या परीक्षणसाठी मुंबईला पाठवण्यात आलेला आहे. अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या मंजिरी देशपांडे मॅडम यांनी सांगितली आहे. तसेच सदर विभागीय स्पर्धेतील सर्व निबंधांचे परीक्षण सुद्धा राज्यस्तरावरुनच करण्यात आलेले आहे असे देशपांडे मॅडम म्हणाल्या.