ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय अन्याय निवारण समिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी अविनाश पवार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी विश्वनाथ मोरे यांची निवड.

सावरवाडी प्रतिनिधी :

राष्ट्रीय अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी शहराध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती कोल्हापूर येथे करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अन्याय निवारण भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेटे व अन्याय निवारण समितीचे सल्लागार निसार वाणी हे होते. यावेळी अन्याय निवारण चे राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीपराव देसाई  यानी आज सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे .जर एखाद्या वरती अन्याय होत असेल तर त्यावर ती आम्ही आवाज उठवला शिवाय व त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही असे आपल्या मनोगतात सांगितले. अध्यक्ष राजाभाऊ शेटे यांनी भारतामध्ये अन्याय निवारण समितीच्या मार्फत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी तत्पर आहोत असे सांगितले. 

या कार्यक्रमामध्ये शहरांमधून अविनाश पवार यांची जिल्हाध्यक्षपदी व करवीर तालुक्यातील कोगे गावातील विश्वनाथ गोविंद मोरे यांची भारत राष्ट्रच्या अन्याय निवारण (कोल्हापूर जिल्हा) ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

या निवडीने आज कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष या पदाने आपल्यावर आणखीन जबाबदारी वाढलेली आहे. ती जबाबदारी आई वडील यांच्या आशीर्वादाने व सर्व मित्राच्या साथीने निभाऊ असे विश्वनाथ मोरे आपल्या मनोगतात सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत अन्याय निवारण समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद दादा कद्रे व आभार जलसिंचन विभागचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर राजू भोसले यांनी केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील व शहरातील अन्याय निवारण समितीचे सदस्य  उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks