ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत; कागलमध्ये सरलादेवी माने हायस्कूलमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

कागल :

ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले. येथील सौ. सरलादेवी माने माध्यमिक विद्यालयात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
           
यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह दि कागल एज्युकेशन संस्थेचे सचिव व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, मुख्याध्यापिका सौ. नंदाताई माने, सुनील माने, बिपिन माने, एस. एस. संकपाळ आदी प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फुले, शालेय साहित्य, सॅनिटायझर, मास्क, चॉकलेट देण्यात आली. तब्बल दोन वर्षांनंतर शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद  ओसंडून वाहत होता.

 

“दक्ष राहा व नियम पाळा…..”

शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारी अजून पूर्णता संपलेली नाही. दक्ष राहा आणि नियम काटेकोरपणे पाळा. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे.
      

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks