शिवराज्याभिषेक उत्सव समिती आणि स्वामी विवेकानंद समाज विकास संस्था कुरणी यांच्या वतीने 2 कोटी 30लाख रुपयांचा विमा देणार : संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम पाटील

मुरगुड प्रतिनिधी :
शेतकरी व कष्टकरी मजूर हे ऊन,वारा पाऊस यांचा सामना करीत बारा महिने चोवीस तास काम करीत असतो.हे काम करीत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला कोणताच मोबदला मिळत नाही त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी संस्थेच्या वतीने शेतकरी व मजूर यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची मजुरांचे अपघात होत आहेत जनावरांना चारा आणण्यासाठी ग जात असताना भारा घेऊन पडणे, सर्प दंश यासारखे अपघात होऊन अनेक शेतकऱ्यांचा दगावले आहेत.अश्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना संरक्षण मिळावे या सामाजिक उद्देश ठेवून हा विमा या संस्थेच्या वतीने वितरित करण्यात येणार आहे .याच बरोबर या अपघातामुळे होणारा दवाखान्याचा दहा हजार रुपयांचा खर्च सुद्धा या संस्थेद्वारे देण्यात येणार आहे. गेली दहा बारा वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना दत्तक घेणे,शेतकऱ्यांना शेती अवजारे वाटप करणे, पूरग्रस्तांना मदत करणे असे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत, असाच हा विमाचा उपक्रम राबवत आहोत याचा फायदा शेतकरी मजूर कष्टकरी लोकांना होईल अशी अपेक्षा आहे.