बाबासाहेब(पिंटू) मधुकर जाधव भोई वाघापुर यांची भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त जातीजमातीच्या भुदरगड तालुका अध्यक्ष पदी निवड

गारगोटी प्रतिनिधी :
बाबासाहेब(पिंटू) मधुकर जाधव भोई वाघापुर यांची भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त जातीजमातीच्या भुदरगड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील व जिल्हा अध्यक्ष श्री समरजीतसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली, भुदरगड आजरा चे युवक नेते , जिल्हा परिषद सदस्य राहुल बजरंग देसाई, भाजपचे तालुका अध्यक्ष विनायक परुळेकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले .
या वेळी वाघापुर चे नेते किरणराव कुराडे, सरचिटणीस अनिल तळकर ,गारगोटी शहराध्यक्ष प्रकाश वास्कर, जिल्हा विद्यार्थी मोर्चा चे अध्यक्ष पार्थ सावंत ,सुरेश खोत, शुभम मगदूम, नवोदय दुध संस्थेचे अध्यक्ष आण्णासो जठार,कृष्णात जठार,दिपक परीट,मोहन एकल,शंकर कुंभार बाळासाहेब जाधव,निवृती आमते, सर्जेराव दाभोळे, राजु दाभोळे, प्रविण कुभार, राजेंद्र भोई, रवि जाधव, सुहास कांबळे. इतर मान्यवर उपस्थित होते.