ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लक्ष्मी नारायण पतसंस्थेची ५५ वी ऑनलाइन सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड तालुका कागल येथील सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेली लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ५५ वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत व उत्साहात पार पडली .

प्रारंभी संस्थेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व लक्ष्मीनारायण प्रतिमेचे पूजन संस्थेचे माजी सेवक ‘ श्री .बळीराम रामाणे , हरी वंदूरे , आप्पासो पाटील , दिलीप शिंदे, जयसिंग भांदिगरे , शंकर गुरव , शंकर मोरे , प्रमोद कवळेकर, यांचे शुभहस्ते ‘करण्यात आले . अहवाल वाचन जनरल मॅनेंजर नवनाथ डवरी यांनी केले .

यावेळी बोलताना चेअरमन पुंडलीक डाफळे म्हणाले अहवाल सालात संस्थेस एक कोटीहून अधिक निव्वळ नफा मिळवून या संस्थेने ऐत्याहसिकअशी नोंद केली आहे . ८५ कोटीहून अधिक खेळत्या भाग भांडवलाच्या आधारे संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात ३०५ कोटी ११ लाखावर आर्थिक उलाढाल केली आहे . तर ५४कोटी २१ लाखावरील ठेवींच्या आधारे तब्बल ४० कोटी ६ लाख कर्ज वितरण केले आहे .एकूण कर्ज वाटपा पैकी २३ कोटी २0 लाखांचे कर्ज हे निव्वळ सोने तारणावर दिले गेले आहे .ठेवींच्या आधारे कर्ज वितरण हा बरोबर शिल्लक ठेवींची सुरक्षित गुंतवणूक २३ कोटी ९० लाखांची केली गेली आहे . तर एन्.पी. ए 0 टक्के इतका नगण्य आहे .

चेअरमन पुढे म्हणाले -सुवर्ण महोत्सवी वर्षात वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले .यामध्ये अंध अपंग विद्यार्थ्यांना गणवेश वाटप , विद्यालयासाठी इमारत बांधकामास अर्थसाहाय्य, वृद्धाश्रमाला आर्थिक सहाय्य याच बरोबरच खाद्य पदार्थ पुरवणे शालेय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वाटप .कोल्हापूर येथील शाहू कालीन पांजरपोळ संस्थेला कायमस्वरूपी दरवर्षी गाईंना चारा पुरविणे या कार्यक्रमांचा विशेष उल्लेख करावा लागेल .सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ६४ लाख रुपयांच्या सभासद भेट वस्तू वितरित करण्यात आल्या .त्यात दोन चादरी, चांदीचे नाणे ब्याग व सभासदांच्या नावे ५०० रुपयांचा शेअर्स कायम स्वरूपी संस्थेतर्फे देण्यात आला याशिवाय सुमारे १३० पानांची चारशेहून अधिक रंगीत छायाचित्रे व नामवंतांचे लेख असलेली .सुवर्णमहोत्सवी स्मरणिका सभासदांना भेट देण्यात आली .

केवळ सुवर्णमहोत्सवी वर्षातच नव्हे तर त्यानंतरच्या पुढील दोन वर्षात सुमारे १७ लाख खर्चाच्या दिवाळी भेटवस्तूही सभासदांना देण्यात आल्या .

आजच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेस १०२ सभासदानी सहभाग घेतला. यामध्ये यशवंत कुंभार, बापू खोराटे, सुदर्शन हुंडेकर, लक्ष्मी घायाळकर, मलिक अत्तार, चंद्रकांत पोतदार, रतन कांबळे, प्रकाश डाफळे आधी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला .

सभेत उपसभापती श्री .रविद्र खराडे , संचालक सर्वश्री -जवाहर शहा , दत्तात्रय तांबट , अनंत फर्नांडीस , विनय पोतदार , किशेार पोतदार , चंद्रकांत माळवदे ( सर ) , दत्तात्रय कांबळे , श्रीमती भारती कामत , सौं . सुजाता सुतार , तज्ञ संचालक जगदीश देशपांडे . यांच्यासह सचिव मारुती सणगर , अंतर्गत तपासणीस श्रीकांत खोपडे , सभासद व अधिकारी वर्ग उपस्थित होता .

स्वागत चंद्रकांत माळवदे ( सर ) यानी केले तर आभार विनय पोतदार यानीं मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks