ताज्या बातम्यानिधन वार्ता
बहिरेश्वर गावचे ज्येष्ठ सहकार नेते पांडूरंग चव्हाण यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील प्रतिष्ठित नागरिक ,कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्या पाणीपुरवठा विभागाचे माजी चेअरमन व जुण्या पिढीतील सहकार चळवळीतील नेते पांडुरंग केदारी चव्हाण ( वय वर्ष ८८ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
बहिरेश्वर गावचे माजी सरपंच मारुती पांडुरंग चव्हाण व कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन शिवाजी पांडुरंग चव्हाण यांचे ते वडील होत .त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे .