ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पाटील कुटुंबियांचा विधायक उपक्रम; रक्षा विसर्जन केले शेतामध्ये.

चंदगड :
शिनोळी खुर्द (ता.चंदगड) येथील हभप यल्लूपा भरमु पाटील वय ८८ वर्ष यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या इच्छेनुसार त्यांची रक्षा फक्त मूठभर गंगेला अर्पण करून बाकीची रक्षा शेतात आणून ०५ कल्पवृक्षांची लागवड करण्यात आली. त्यांचा या विधायक उपक्रमाचे इतरांनीही अनुकरण केल्यास वावगे ठरनार नाही.