भरघोस उपन्न देणाऱ्या भात बियाण्यांची निवड करावी : ह.भ.प.वसंत साबळे

कुडूत्री प्रतिनिधी :
शेती करत असताना शेतकऱ्यांनी “सुंदर” सारख्या चांगले उत्पादन देणाऱ्या बियाणांची निवड करावी व भरघोस उत्पादन घ्यावे असे उद्गार क!!तारळे (ता. राधानगरी)येथील प्रगतशील शेतकरी ह.भ.प.वसंत साबळे यांनी महिंद्रा सिड्स कंपनीच्या वतीने आयोजित भात पीक पाहणी कार्यक्रम प्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले कटुंबाला वर्षभर पुरेल अशा भात बियाण्याची निवड करून आधुनिक तंत्र आणि यंत्र यांची सांगड घालून भात पिकाचे उत्पादन घेतले पाहिजे. व आपली गरज भागवली पाहिजे.त्यासाठी तितकेच कष्ट महत्वाचे असल्याचे त्यानी या वेळी नमूद केले.
नुकताच महिंद्रा कंपनीच्या वतीने गायमाळ(क!!तारळे)येथे “सुंदर “या भात पिकाचा पीक पाहणी कार्यक्रम अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. कंपनीकडून अनेक भात बियाणे उपलब्ध आहेत.त्यामध्ये,सुंदर,सौभाग्य,किरण,कल्पना,३०३०,अशी बियाणे उपलब्ध आहेत.या बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा व भरघोस उपन्न घ्यावे असे आवाहन कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर सुरेश चौगले (कुडूत्री) यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
प्रगतशील शेतकरी वसंत साबळे यांनी सुंदर या जातीच्या बियाण्याचे उत्कृष्ट पीक घेतल्याबद्दल कंपनीच्या वतीने त्यांचा शाल फेटा,भिंतीवरील घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर शेती सेवा केंद्राचे मालक सुरेश शिवूडकर, पत्रकार रमेश साबळे,पत्रकार सुभाष चौगले, यांचा सत्कार यावेळी कंपनीच्या वतीने करण्यात आला.तर साबळे परिवाराच्या वतीने मार्केटिंग ऑफिसर सुरेश चौगले यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
या भात पीक पाहणी कार्यक्रमास परिसरातील शेतकरी उपस्थित होते.त्यामध्ये मधुकर साबळे, पांडुरंग पाटील,दत्तात्रय पाटील,सुरेश गुरव,सदाशिव पाटील,दिनकर कांबळे,सदाशिव शिपेकर,केरबा पाटील,संजय पाटील,संजय सावंत,शामराव हजाम,मधुकर कांबळे, एकनाथ पाटील,संतोष पाटील,केरबा पाटील,सुरेश शिउडकर,सुरेश चौगले,,सुरेश डवरी,विष्णू एकावडे,साहिल सायेकर,तशेच अन्य शेतकरी उपस्थित होते.
प्रास्ताविक सुरेश चौगले,स्वागत रमेश साबळे व आभार मधुकर साबळे यांनी मानले.