गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : १३ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती.

कोल्हापूर : 

१३ वर्षीय शाळकरी मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी आठ महिन्यांपासून सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार रविवारी उघडकीला आला. संभाजीनगर परिसरात राहणार्‍या दोघांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, ओळखीचा गैरफायदा घेऊन संशयितांनी तिच्याशी सलगी वाढविली. तिच्या असहायतेचा फायदा घेत वेगवेगळ्याठिकाणी तसेच संशयिताच्या घरी नेऊन वेळोवेळी अत्याचार केले. ७ ते ८ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. शनिवारी सकाळी तिची प्रसूती झाली आणि काही वेळातच अर्भकाचा मृत्यू झाला. मुलीच्या नातेवाईकांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks