उत्तूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ : नविद हसनसो मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री नाम. हसनसो मुश्रीफ साहेबांच्या फंडातुन ०१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला यामध्ये प्रभाग क्र. ०६ मधील श्री महादेव मंदिर सुशोभीकरण १५ लाख, प्रभाग क्र. ०६ मधील महादेव गल्ली व सावंत गल्ली आर.सी.सी.गटार्स करणे ३० लाख, उत्तुर अंतर्गत रस्ते करणे ४५ लाख व उत्तूर विद्यालय कडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधणे ४२ लाख अश्या विविध विकास कामाचा शुभारंभ केले. अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी कागल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मा.वसंतराव धुरे होते.
उत्तूरच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब यांनी सातत्याने भरभरून निधी उपलब्ध करून दिला असुन यातुन रस्ते, गटर्स, सुशोभिकरण, सांस्कृतीक हॉल, मंदिर, पुल, व्यायामशाळा, पाणंदी, दवाखाना इमारत अशी विवीध विकास कामे साकारली असून उत्तूर परीसरात येत्या वर्षभरात एकही विकास काम शिल्लक राहणार नाही असा विश्वास नविद हसनसो मुश्रीफ यांनी व्यक्त केला..!!
वसंतराव धुरे म्हणाले, मुश्रीफ साहेबांनी उत्तूर विभागाला विकासाची गंगा उभी करून दिली असून नागरीकांचे जिवन सुसह्य करण्याचे झंझावाती कार्य केले असुन पुढील विकास कामांसाठी पाठपुरावा करणार राहणार.
पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई यांनी स्वागत केले. यावेळी माजी जि.प. सदस्य काशीनाथअण्णा काशिनाथ आण्णा तेली, आजरा साखरचे संचालक मारूतीराव घोरपडे, डॉ. प्रकाश तौकरी, पंचायत समिती बांधकाम उपअभियंता सूर्यकांत नाईक, गणपतराव घेवडे, उद्योजक रहीमान नायकवडी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुतीराव झेंडेपाटील, विठ्ठल उत्तूरकर, ग्रा.प. सदस्य विजय गुरव, ग्रा.प. सदस्य दिपक कांबळे, मिलींद कोळेकर, गोविंदराव गुरव, संजय गुरव, गंगाधर हराळे, जयकुमार आमनगी, दशरथ आजगेकर, सुधीर सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार आजरा तालुका संघाचे संचालक गणपराव सांगले यांनी मानले..!!