वडणगे, निगवे दुमाला येथे,एस के एंटरप्रायझेस, अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर्स ॲन्ड मशिनरी ओनर्स असोसिएशन व सेवाव्रत प्रतिष्ठान आयोजित गरजू होतकरू विद्यार्थ्यांना केले पुस्तके वाटप.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
नर्मदा प्रकाशनचे प्रकाशक व लेखक माननीय श्री. अमृतराव किसन काळोखे यांचेकडून कै. किसन काशिनाथ काळोखे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रू.1,20,000( एक लाख एकवीस हजार) किंमतीची शालेय पुस्तके श्री. ज्योतिर्लिंग विद्यामंदिर, वडणगे निगवे दुमाला शाळेत माननीय धर्मादाय आयुक्त श्री. हेर्लेकर साहेब यांचे अध्यक्षतेखाली व माननीय माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर साहेब, माननीय उपशिक्षणाधिकारी सौ. शिंदे मॅडम, माननीय उपशिक्षणाधिकारी श्री. मोरे साहेब, एस. के एंटरप्रायझेसचे माननीय श्री. किशोर शहा व शितल शहा, अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर्स ॲन्ड मशिनरी ओनर्स असोसिएशनचे माननीय अध्यक्ष श्री. संजय चौगुले, माननीय संचालक पै. राजाराम यमगर व सेवाव्रत प्रतिष्ठानचे माननीय श्री. संभाजी उर्फ बंडा साळोखे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, महेश यादव, तुषार , संयम शहा रोनक शहा व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.