बी.डी.पाटील फौंडेशनतर्फे कडगांव व पाटगांव आरोग्य केंद्रांना सिरींज व पी.पी.ई कीट वितरण

कडगांव :
“भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागातील आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी बी.डी.पाटील फौंडेशनच्या वतीने सुरु असलेले कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”असे प्रतिपादन संदीप वरंडेकर यांनी केले. कडगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पी.पी.ई.कीट वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी फौंडेशनचे अध्यक्ष बी.डी.पाटील होते.
भुदरगड तालुका हा अनेक वाड्यावस्त्यांनी विखुरलेला असून तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. बी.डी.पाटील फौंडेशनच्या वतीने या भागासाठी रुग्णवाहिकेचीची उपलब्धता करून दिल्यानंतर कडगांव व पाटगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच आशा सेविका आणि कोविड काळात उत्कृष्ठ सेवा बजावणारे काही खाजगी डॉक्टरस यांना 200 पी.पी.ई.कीट वितरीत करण्यात आले. तसेच गेले काही दिवस कोविड लसीकरण करण्यासाठी सिरींज पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हत्या त्यामुळे लसीकरण करण्यात अडचण निर्माण झाली होती. ही समस्या लक्षात घेऊन 2000 सिरींज दोन्ही आरोग्य केंद्रात वितरित करण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाउपाध्यक्ष बाजीराव देसाई, उपसरपंच रमेश रायजादे, फौंडेशनचे सदस्य जयसिंग पाटील, वसंत पाटील, बी.ए.पाटील, पाटगांवचे सरपंच विलास देसाई, हरिश्चंद्र देसाई, मारुती पोवार, अक्षय पाटील, यतिन पिळणकर, संतोष संकपाळ, शशिकांत पाटील, जे.आर.डिसोजा, मारुती संकपाळ, गौरव पाटील, अमित पाटील, डॉ.वर्धन, डॉ.एम.एम.शिंदे, आरोग्य कर्मचारी संदीप राणे, पाठक, ढोणूक्षे, शुभांगी देसाई, रंगराव पाटील, पांडुरंग पाटील, महेश उळेगड्डी, दिलीप पाटील, दिलीप झाटे, किरण पाटील, सत्यजित पाटील, रोहित भुतल, बस्त्याव भुतेलो, संग्राम पाटील, जयसिंग मांगले, शिवाजी पाटील, सुनील पाटील, बबन डेळेकर, तानाजी डेळेकर यांसह फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते. सचिव एकनाथ पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर समीर मकानदार यांनी आभार मानले.