हा पराभव पचवणे कठीण : कर्णधार के. एल. राहुल; प्रतिक्रिया देताना राहुल झाला भावूक…

NIKAL CRICKET UPDATES :
आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पंजाब किंग्ज इलेव्हन आणि राजस्थान रॉयल्स (PBKSvsRR ) यांच्यातील सामना रंगतदार ठरला. शेवटच्या षटकात पंजाबला चार धावांची गरज असताना कार्तिक त्यागीने (1 धाव, 2 विकेटस्) केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर अवघ्या दोन धावांनी थरारक विजय मिळवला.
यावर पंजाब किंग्ज इलेव्हनचा (Punjab Kings) कर्णधार के. एल. राहुल (KL Rahul) याने प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात आपला संघ चांगल्या स्थितीत होता. तरीही आम्ही हारलो. हा पराभव पचवणे कठीण असल्याचे के. एल. राहुल (KL Rahul) याने म्हटले आहे.
आम्ही दबाव चांगल्या पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न केला. हा पराभव पचवणे कठीण आहे. कारण आम्ही याआधीच्या चुकांमधून काहीच शिकलो नाही. आम्ही पहिल्या सहा षटकांत चांगली गोलंदाजी केली. पण त्याचा फायदा झाला नाही, असे के. एल. राहुल म्हणाला.
शेवटच्या षटकात पंजाबला चार धावांची गरज होती. पण कार्तिक त्यागीने केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर अवघ्या दोन धावांनी थरारक विजय मिळवला. यामुळे पंजाबच्या अर्शदीप सिंग (32 धावांत 5 विकेटस्) व मोहम्मद शमी (21 धावांत 3 विकेटस्) यांची भेदक गोलंदाजी व मयंक अग्रवाल (67), के. एल. राहुल (49), मार्करम (नाबाद 26) यांची फलंदाजी मात्र व्यर्थ ठरली. त्यागीला सामनावीर पुरस्कार मिळाला.
राजस्थानने २० षटकांत १० बाद १८५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा खेळ १८३ धावांवर आटोपला.
Award for CRED Power Player of the Match between @PunjabKingsIPL and @rajasthanroyals goes to KL Rahul@CRED_club #CREDPowerPlayer #VIVOIPL pic.twitter.com/dotqbaBdDS
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2021