ओजस हाॕस्पिटल सिद्धनेर्ली वर्धापन दिनानिमित्त डाॕ.अरुण पोवार यांनी जपली माणूसकी .

सिद्धनेर्ली :
सिद्धनेर्ली ता.कागल येथील नदिकिनारा येथे 1वर्षापुर्वी ओजस हाॕस्पिटल सुरु केले. कोरोणा काळात रुग्णसंख्या वाढत होती.डाॕ.अरुण पोवार यांनी काळाचे ,वेळेचे भान न ठेवता दिवस रात्र रुग्णांची सेवा केली. बाहेर ठिकाणी लाख सव्वा लाख बिल होत असतानाही स्वतःच्या अनुभवावर नाममात्र अगदी अल्प रक्कमेत पेशंटला कोरोनापासून मुक्त केले.आज या ओजस हाॕस्पिटलला 1वर्ष पुर्ण होत आहे.यानिमित्त डाॕ.अरुण पोवार यांनी वृद्ध सेवा आश्रम ला भेट देऊन जिवनावश्यक साहित्य देत माणुसकी जपण्याचे काम केले.यावेळी वृध्दाश्रमांच्या अध्यक्षा विमल सुतार यांनी डाॕ.पोवार यांनी दिलेल्या देणगीबद्दल आभार मानले व हाॕस्पिटल अजुनही मोठे होऊन जास्तीतजास्त रुग्णांची सेवा घडावी अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी डाॕ.अरुण पोवार, रोहिणी पोवार यांनी धान्य वाटप केले.यावेळी रेखा पोवार, नम्रता पोवार, राकेश पोवार, केतन पोवार, आर्नवी पोवार उपस्थित होते.