सौमय्या यांना कितीही सुरक्षा पुरवली तरी त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवुच; कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी आक्रमक.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.त्यातच किरीट सोमय्या सोमवार दि. 20 रोजी घोरपडे कारखान्यासह कागल मतदार संघातील काही ठिकाणी भेटी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जिल्ह्यात संतापाची लाट असताना दौरा करून त्यांनी कोल्हापूरकरांना एक आवाहनच दिले आहे त्यामुळे त्यांना कितीही सुरक्षा पुरवली तरी त्यांना कोल्हापूरी हिसका दाखवूच असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, ज्येष्ठ नेते आर. के पवार,आदिल फरास, राजू लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.
गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे कारखाना काढला आहे. लोकांनी घामाचे कष्टाचे पैसे देऊन कारखान्याचे शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र किरीट सोमय्या हे बदनामीसाठी खोटे आरोप करत सुटले आहेत.
मात्र आता कोल्हापूरची जनता गप्प बसणार नाही.
मुंबईतील भय्या कोल्हापुरात येऊन येथे आव्हान देत असेल तर त्याला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. रेल्वे स्टेशनपासून संताजी घोरपडे साखर कारखाना, कागल, मुरगूड अशा ज्या ज्या ठिकाणी सोमय्या जातील, त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांना हिसका दाखवतील, अशा इशाराही पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला. या पत्रकार परिषदेस अनिल साळोखे, महेंद्र चव्हाण, मधुकर जांभळे व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.