मुरगूड नगरपालिका निवडणूक भाजपा ताकदीने लढविणार : समरजितसिंह घाटगे; राजे फाउंडेशनच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी अपक्ष उमेदवार असूनही मुरगूड शहरामध्ये आम्हाला चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांच्या साथीने नगरपालिका निवडणुक भाजपाच्या वतीने ताकदीने लढविणार आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील राजे फाउंडेशनच्या स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन वेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या हस्ते मुख्य बाजारपेठेतील राजे फौंडेशनच्या स्थलांतरीत कार्यलयाचे उदघाटन झाले.
ते पुढे म्हणाले, विधान सभेच्या निवडणुकीवेळी येथे एकही सभा घेतली नाही.केवळ एक पदयात्रा काढली.तरीही मुरगूड शहरामध्ये चांगली मते आम्हाला मिळाली. या पार्श्वभूमीवर गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील यांच्या साथीने नगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी केली आहे. असेही ते म्हणाले.
या निवडणुकीसाठी अन्य कुणाचा युतीसाठी प्रस्ताव आला आहे काय? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, निवडणुकीवेळी समविचारी मंडळींनी आमच्यासोबत येण्याचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व आपण चर्चा करून या बाबतीत निर्णय घेऊ.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,राजे बँकेचे चेअरमन एम.पी पाटील,शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडीस,दत्तामामा खराडे,सुशांत मांगोरे,अमर चौगुले,रामभाऊ खराडे,संजय पाटील,सुनिलराज सुर्यवंशी,विजय राजिगरे,दगडू शेणवीसदाशिव गोधडे, विजय गोधडे, अनिल अर्जुने आदी उपस्थित होते.