ताज्या बातम्यामहाराष्ट्र
लायन्स क्लब कोल्हापूर वेस्ट आणि लायन्स हाॅस्पिटल मिरज,तुलसी ब्लड बॅंक उदगाव, सुतार लोहार समाज कोरोची यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी ,नेत्र शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून लायन्स क्लब कोल्हापूर वेस्ट आणि लायन्स हाॅस्पिटल मिरज,तुलसी ब्लड बॅंक उदगाव, सुतार लोहार समाज कोरोची यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी,शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला.
यावेळी लायन्स क्लब कोल्हापूर वेस्टचेअध्यक्ष मोहन हजारे, ट्रेझलर लायन गुरुदत्त म्हाडगुत, लायन नंदकुमार मराठे, लायन संजय चोडणकर, लायन नंदकुमार सुतार, सुतार लोहार समाज कोरोचीचे अध्यक्ष सचिन सुतार यांच्यासह अनेक सामाजिक मान्यवर उपस्थित होते . सदर कार्यक्रमाला एमजेएफ रघुनंदन बेलेकर यांचे विशेष योगदान लाभले.