गारगोटीच्या साई मंदिरात कोविड लसीकरण मोहिम लसीकरण पुर्ण

गारगोटी :
युथ कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ साई कालनी गारगोटी मंडळाच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या तालुका आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
या बध्दल अधिक माहिती देताना मंडळाचे जेष्ट मार्गदर्शक गारगोटी ग्रामपंचायतीचे सदस्य व भाजपचे गारगोटी शहराध्यक्ष प्रकाश वास्कर म्हणाले की, युथ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ. साई कॉलनी गारगोटी व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोरोना च्या महामारी मध्ये १००% लसीकरण पूर्ण कामाचे आयोजन केले जात आहे तसेच आई वडिलांचे पाद्यपूजन, नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योगशिबिर अश्या प्रकारचे विधायक उपक्रम नेहमी घेतले जातात.यावेळी युथ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गोजारे,पत्रकार अनिल कामिरकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर,सिनेअभिनेते दिगंबर कालेकर,सुशांत माळवी सचिन भांदिगरे सर,संजय पाटील,महेश फुटाणकर उदय शिंदे सुनिल पाटील सुनिल हिरेमठ सुय॔कांत गोजारे हेमंत देसाई आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या लसीकरण मोहिमेत 300 नागरीकानी सहभागी झाले.या वेळी प्रदिप शिंदे ओकार देसाई ओमकार पाटील सिद्धेश मोरे ॠशीकेश चव्हाण हरिष कांबळे आल्फेड डिसोझा प्रथमेश मुगडे प्रथमेश चव्हाण यश गोजारे दिप पाटणे आदित्य चव्हाण मंदार फुटाणकर सत्यजीत लाड अखिलेश जाधव सिद्धेश वेदांते आमित पाटील प्रतिक बागुल ओमकार सुतार साई मंदिर परिवार तील सव॔ सदस्य उपस्थीत होते.