कोगे येथे पुराच्या पाण्यामुळे नदीकाठी झाडावर अडकलेल्या वानरांना बाहेर काढण्यात आले यश.

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील कोगे गावातील भोगावती नदीपात्रातील पाण्याने नदी परिसराला . वेढा दिला होता .झाडावर अडकलेल्या वानरांना सुखरूप बाहेर काढण्यास यश आले
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रसाद संकपाळसाहेब व टीमच्या माध्यमातून वानरांना बाहेर काढण्यासाठी सुरुवात करण्यात आली. दोन बोटी व त्यासोबत जवळपास चाळीस युवकांची टीम सक्रिय झाली
शासकीय आदेशाचे कार्यतत्परतेने पालन करणे हे सर्व कोगे ग्रामस्थांनी व तरुणांनी याची देही… याची डोळा… रात्री अकरापासून दोन वाजेपर्यंत सुरु असलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून पाहिले. अंधारी रात्र व पाण्याचा प्रवाह या दोन गोष्टींमुळे रात्री या वानरांना सुरक्षित स्थळी हलवणे धोक्याचे असल्याने या टीमने त्या वानरांना केळी व इतर खाद्य पदार्थ देऊन आपले स्प्रिंग ऑपरेशन तात्पुरते थांबवले.
सकाळी 6 वाजल्यापासून परत या टीमने बोटीच्या सहाय्याने त्या वानरं पैकी चार वानरांना सुरक्षितस्थळी पोचवले व राहिलेल्या वानरांना सुरक्षित स्थळी जाता यावे. यासाठी झाडाला दोर बांधून ठेवला त्यापैकी दोन वानरांना या दोरच्या आधारे बाहेर येण्यात यश आले. कोगे गावातील ग्रामपंचायत सरपंच, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, करवीर पंचायत समिती सदस्य, प्रशासकीय सर्व विभागातील पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नातून जवळपास या सर्व ऑपरेशनमध्ये रात्री अकरा पासून सकाळी अकरापर्यंत बारा तासात आठ वानरांना बाहेर काढण्यात यश आले. यावेळी वनखात्याचे मानद वन्यजीव विभागाचे वन अधिकारी विजय पाटील, वनरक्षक के पी राहाटे, स्वप्निल पवार, व टीम यांच्या अनुभवानुसार राहिलेल्या दोन वानरांना दोरीच्या आधारे येण्यासाठी वेळ द्यावा यावर एकमत होऊन हे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करून त्या मानवाला दोरीच्या आधारे येण्यासाठी वेळ देण्यात आला.
यावेळी आधार फाउंडेशन जिल्हा संपर्कप्रमुख विक्रम काटकर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ४० लोकांच्या टीमने वानरांना सुखरूप बाहेर काढले . यावेळी सुनील कांबळे, कृष्णा सोरटे, शुभम काटकर, सुरेश पाटील, राज मोरे ,विनायक लांडगे विकास चव्हाण करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी,कोगे गावचे पोलीस पाटील दत्तात्रय मिठारी, संतोष पाटील, गावातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मानद वन्यजीव अधिकारी, वनरक्षक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.