ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
भडगाव येथे हनुमान मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोरोना संकटाच्या काळात रक्ताचा साठा अपुरा पडत आहे.या पार्श्वभूमीवर भडगाव येथील हनुमान तरूण मंडळाकडून गणेशोत्सवानित्त आज गुरूवार दिनांक १६।९।२१ रोजी सकाळी साडे दहा ते तीन या वेळेत रक्तदान शिबीर आयोजन केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
ग्रामदैवत हनुमान मंदिरात रक्तदान शिबाराचा प्रारंभ मुरगूड पोलिस ठाण्याचे सह्याक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते होणार आहे. रक्त संकलनासाठी डी.वाय.पाटील हाॅस्पीटल ची वैद्यकिय पथक उपस्थित रहाणार आहे.रक्तदात्यांचा डि. वाय. पाटील हाॅस्पीटल व मंडळाकडून सन्मान केला जाणार आहे.