संदिप बोटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार : प्रा.तुकाराम पाटील

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्वराज्य निर्माण चे संस्थापक संदिप बोटे यांचा वाढदिवस 22 सप्टेंबर यावर्षी ही सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करणार असल्याचे संदिप बोटे वाढदिवस गौरव समिती च्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे प्रा.तुकाराम पाटीलसर यांनी सांगितले. संदिप बोटे यांनी आतापर्यंत स्वराज्य निर्माण च्या माध्यमातून समाजपयोगी उपक्रम राबविले असुन त्यांनी समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये लेक वाचवा देश वाचवा,इतिहास छत्रपतींचा,आपला गाव आपला विकास, महिला सबलीकरण, होममिनीस्टर, व्रुद्धाश्रमात धान्य वाटप अशा सामाजिक उपक्रमाबरोबरच कोरोना काळात तालुक्यात मास्क वाटप,आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना सन्मानपत्र वाटप,गुणवंत विद्यार्थी सन्मान, स्वराज्य युवा संवाद, असे वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. याची दखल घेऊन त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
यावर्षी ही संदिप बोटे यांचा 22 सप्टेंबर वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे यामध्ये कागल तालुक्यात 22 मोफत डोळे तपासणी शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप,15 ते25 वयोगटातील युवक युवतींना मोफत पुस्तके वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रा.तुकाराम पाटील यांनी सांगितले.यावेळी सुभाष भोसले बोलताना म्हणाले की संदिप बोटे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आपल्याला मानणारा एक वेगळा वर्ग निर्माण केला असून भविष्यात खुप मोठ्या संधी मिळतील.यावेळी बैठकीस एच.आर.पाटील सर,विश्वनाथ कोरे,विकास सावंत, आनंद गायकवाड, रोहित बोटे, वैभव आंगज, प्रतिक बोटे, लक्ष्मण कोगणोळे, साताप्पा पाटील व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.