ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी संघटनांची २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक

कोल्हापूर प्रतिनिधी :

कृषी सुधारणा कायद्याविरोधात केंद्र सरकार विरोधात शेतकरी आंदोलकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकरी संघटनांनी २७ सप्टेंबर ला शेती सुधारणा कायद्याविरोधात ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे.शेतकरी संघटनांनी गाव, शहर तसेच राज्यातील शाखांना बंद ची तयारी करण्याचे निर्देश दिले असून, बंद १००% यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार भारत बंद यशस्वी करण्यासाठी राज्यातील शेतकरी संघटना, जिल्ह्यातील शेतकरी संघटना, ट्रेड युनियन, युवा संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, व्यापारी संघटने सोबत यासंबंधी बैठक करणार आहेत.सर्व संघटनेच्या एकाजुटीने बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यासोबतच गाव, शहर तसेच राज्यनिहाय बंद यशस्वी करण्याची जवाबदारी पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.किसान मोर्चा ने राज्यातील शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाला प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त किसान मोर्चा ची शाखा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आली आहेत. आंदोलन गावोगावी पोहोचवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks