गडमुडशिंगी येथील जिल्हा परिषदेची कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेसाठी लवकरच नवी सुसज्ज इमारत उभारण्यात येणार : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापुर दक्षिण मतदारसंघातील गडमुडशिंगी येथील जिल्हा परिषदेची कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेची जीर्ण झालेल्या इमारतीच्या नूतनीकरणासंदर्भामध्ये आज प्रत्यक्ष भेट देऊन आ. ऋतुराज पाटील यांनी पाहणी केली.
सदर शाळेचे बांधकाम जुने असल्याने ही इमारत पाडून नवीन सर्व सुविधायुक्त अशी इमारत बांधण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबतचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला असून यावर आज चर्चा करण्यात आली.
इयत्ता पहिली ते सातवीसाठी सुसज्ज वर्ग आणि मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या, प्रसाधनगृह, खेळण्यासाठी मैदान आदी सुविधांयुक्त इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी, पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब आणि शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाडजी यांच्याकडे निधी साठी पाठपुरवठा करण्यात येणार असून लवकरत लवकर ही इमारत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी, पं.स. सदस्य प्रदीप झांबरे, बिडिओ जयवंत उगले, बाबासो माळी, विनोद सोनुले, सचिन पाटील, रावसाहेब पाटील, विजय पाटील गट शिक्षण अधिकारी शंकर यादव, प्रमोद चौधरी, बाबासो सुर्वे, मुख्याध्यापक सुभाष भोसले, आनंदा बनकर, सुदर्शन पाटील, दिलीप थोरात, चंद्रकांत नेर्ले, पांडुरंग पाटील, संतोष कांबळे, संदीप गौड, सुभाष सोनूले, राहुल गिरुले, शिवराज पाटील, दत्त नेर्ले, राजू दांगड, नंदकुमार गोंधळी, उत्तम शिंदे, लखन माळी आदी उपस्थित होते.