ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यटन क्षेत्राला जोडणारा धोंडेवाडीचा घाट बनतोय मृत्युचा सापळा

सावरवाडी प्रतिनिधी  :

सह्याद्री पर्वत रांगाच्या अंतिम टप्प्यातील पश्चिम घाट माथ्यातील पर्वत रांगाच्या पायथ्याशी  असलेल्या करवीर तालुक्यातील धोंडेवाडी परिसरातील घाट बनतोय मृत्यूचा सापळा . नागमोडी वळणाच्या या  अरुंद घाटामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात घाटाच्या रुंदीकरणाचे काम शासकिय निधी अभावी पासुन वंचित आहे . 

                 

करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सातेरी महादेव  या पर्याटन क्षेत्राला जोडणाऱ्या वाहतुकीच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही . नागमोडी वळणांच्या मुख्य घाट मार्गातून जोडणारे रस्ते, व  घाट अरुंद आहेत . परिणामी वाहनधारकांची मोठी गोची होत आहे . 

                 

धोंडेवाडी परिसरात मुख्य वाहतुकीचा रस्ता लहान असल्याने हा घाट अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे . या घाटात अनेक लहान मोठे अपघात घडतात . घाटाचे रुंदीकरण करण्याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले  आहे . रुंदीकरणाअभावी सातेरी महादेव पर्याटन क्षेत्रात होणारी अवजड वाहतुक थंडावली आहे.

धोंडेवाडी घाटाच्या रुंदीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा करू ! 

” पर्यटन क्षेत्रात ग्रामीण वाहतुकीच्या दृष्टीकोनातून  धोंडेवाडी घाटाचे रुंदीकरणाच्या कामासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू ‘ “

राजेंद्र सुर्यवंशी 

( माजी सभापती व विद्यमान सदस्य करवीर पंचायत समिती ) 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks