राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.51 दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 3 खुला आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1400 व सांडव्यातून 1428 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-233.51, तुळशी -97.56, वारणा -972.73, दूधगंगा-708.94, कासारी- 76.99, कडवी -71.24, कुंभी-74.40, पाटगाव 103.69, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.650, घटप्रभा -44.170, जांबरे- 23.230 आंबेआहोळ – 30.980, कांदे- 6.060 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर, बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे – राजाराम 23.6, फूट, सुर्वे- 23, रुई 52.3, इचलकरंजी 49.3, तेरवाड 44.3, शिरोळ -34.9 तर नृसिंहवाडी 29.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.
जिल्ह्यातील पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील 14 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव आणि कासारी नदीवरील यवलूज व ठाणे आळवे या बंधाऱ्यांचा समावेश आहे.