भारतीय जनता युवा मोर्चातर्फे “सेल्फी विथ बाप्पा”स्पर्धेचे आयोजन : नगसेवक विजयसिंह खाडे-पाटील

कोल्हापुर, प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच “सेल्फी विथ बाप्पा” या स्पर्धेचे कोल्हापूर शहरामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये आपण आपल्या घरगुती गणेश मूर्ती सोबत केलेली आरास, केलेली वेशभूषा, या सर्वसमावेशक घटकांचा विचार करुन तज्ञ परीक्षकांच्या निर्णयाव्दारे अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे.
या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसुन. एक स्पर्धक एकच सेल्फी पाठवू शकतो. निकालांती सर्व सहभागी व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी आपला सेल्फी दिनांक 15 सप्टेंबर 2021 पुर्वी 95 79 17 21 11 या क्रमांकावर वॉट्सएप्प करावे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी केले.