ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात

नागणवाडी : मष्णू पाटील
गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपल्याने नागणवाडी परिसरात मंडप उभारणीच्या कामांना वेग आला आहे व बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे.नाहक खर्चाला बगल देऊन आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे.
काही ठिकाणी मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे तर काही ठिकाणी मंडप उभारणीनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांची आकर्षक सजावट करण्याची लगबग सुरू झाली आहे.इतर मंडळांच्या तुलनेत आपल्या मंडळात बाप्पाच्या मूर्तीसाठी केलेली सजावट लोकांच्या पसंतीस उतरावी म्हणून सजावटिकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुती बाप्पाच्या सजावटीसाठीची लगबगही सुरू असून त्यासाठी बाजारात गणेशभक्तांची गर्दी होत आहे.