ग्रामीण जनतेच्या विविध प्रश्नाबाबत लढा उभारणार : कॉं. नामदेवराव गावडे

सावरवाडी प्रतिनिधी :
साठ वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्सितल मिळावी, विभक्त कुटुंबांना नवीन रेशन कार्ड त्वरीत मिळावेत , पुरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहिर करा , साखर कारखाण्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाची उचल वेळेत करावी या व इतर मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फ तालुका वार लढा उभारणार असे प्रतिपादन किसान सभेचे राज्य सचिव नामदेवराव गावडे यांनी केले.
किसान सभेतर्फ करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील गणाचार्य सभागृहात आयोजित कार्यर्कत्याच्या व्यापक बैठकीत गावडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी कॉ दिनकर सुर्यवंशी होते. यावेळी बोलतांना कॉ गावडे म्हणाले करवीर तालुक्यात कष्टकरी जनतेचे प्रश्न वाढत असून संघटीत ताकद उभी केल्या शिवाय प्रश्न सुटणाऱ नाहीत.
बैठकीत कॉ. दिनकर सुर्यवंशी, कॉ. वाय. एन. पाटील, कॉ. सदाशिव खाडे, कॉ. पंडीत राबाडे, कॉ रामचंद्र जाधव, कॉ. शिवाजीराव तळेकर, आनंदा सुतार, उपसरपंच सुवर्णा दिंडे, आदिची भाषणे झाली.
२७ सप्टेंबर जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीन कायद्यांना विरोध करण्यासाठी येत्या २७ सप्टेंबर रोजी देशभर होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. असे गावडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले .