घरी येऊन मानसन्मान करणारी अनंतशांती महाराष्ट्रातील पहिली संस्था : संजय जांगनुरे; आदर्श पुरस्काराचे नुकतेच वितरण

कुडूत्री प्रतिनिधी :
अनंतशांती सारखी घरी येऊन पुरस्कार प्रदान करणारी व मानसन्मान करणारी सामाजिक संस्था आपण पहिल्यांदा आपल्या कारकिर्दीत पाहिली असे प्रतिपादन केंद्रप्रमुख जांगनुरे सर यांनी अंनतशांतीच्या वतीने नरतवडे (ता राधानगरी) येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान व वितरण प्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले “पुरस्कार घेण्यासाठी पुरस्कार कर्त्याला कार्यक्रम स्थळी जावे लागते पण घरी येऊन मान सन्मान करणारी अनंतशांती पहिली संस्था आहे. खरोखरच अनंतशांती सामाजिक संस्थेने राधानगरी तालुक्यातील दोन शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केलेली निवड ही कौतुकास्पद असून या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.आज सद्यस्थितीला पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आम्हीही या पुरस्काराने भारावून गेलो असल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
नुकताच राधानगरी तालुक्यातील दोन आदर्श शिक्षक मोहन सुतार सर(पनोरी),व संदीप वाली सर (नरतवडे)यांचा संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. फेटा,शाल,सन्मानपत्र,ट्रॉफी,देऊन कौटुंबिक सत्कार ही कार्यक्रमात करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना “मोहन सुतार सर म्हणाले “आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे चीज झाले असून इथून पुढे ही आमच्या कार्याची जबाबदारी वाढली आहे.आमच्या कार्याची दखल घेत अनंतशांतीने जो पुरस्कार दिला हे आमचे भाग्य असून समाजात खऱ्या कार्याची दखल घेणारी आज ही माणसे शिल्लक असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
वाली सर म्हणाले”आमच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप यामुळे आमच्यात नवचैतन्य निर्माण झाले असून या पुढेही आम्ही समाज,विद्यार्थी, घडवण्यासाठी आम्ही झटत राहणार असल्याचे मनोगतात सांगितले.
कार्यक्रमात संस्थापक अद्यक्ष भगवान गुरव,घनश्याम मामा मोरे,आदींनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमास संस्थापक अद्यक्ष भगवान गुरव,घनश्याम मामा मोरे,दुधगंगानगर केंद्रप्रमुख संजय जांगनुरे सर,वाळवा ग्राम पं. सदस्य शेखर पाटील,प्रवीण कांनकेकर,विजय जांगनुरे,युवराज सुतार,बाबुराव नाटेकर,वासुदेव पाटील ,आदी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांबळे (कुडूत्री)आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत युवराज सुतार सर यांनी तर आभार सुभाष चौगले यांनी मानले.