गारगोटी येथील प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे यांच्यावर आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला; ९ जणा विरोधात गुन्हा नोंद

गारगोटी प्रतिनिधी :
आक्रोश मोर्चा काढल्याचा राग धरून विरोधी आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांनी गारगोटी प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे यांच्यावर हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत.या बाबत भुदरगड पोलीसात गुंन्हा नोंद झाला आहे.याविषयी दाखल केलेल्या तक्रारीत मुगडे यांनी असे म्हटले आहे की,मच्छिंद्र मुगडे व त्यांचे चार सहकारी आर्या टी स्टॉल येथे चहा घेण्यास गेले असता.अरुण शिंदे यांनी मच्छिंद्र मुगडे यांच्या गळपटीला धरून अरुण शिंदे यानी धरले व ओढत आणले त्याच वेळी तेथे असलेल्या अजित चौगले यानी कुर्ची डोक्यात मारली.तर अमेल कलकनटकी यांनी हातातील पोटावर मारला. राजू चिले यांनी कपाळावर मारहान केली त्याच।वेळी आदित्य शिंदे बंटी सुर्यवंशी, दिल्प देसाई,संदिप शिंदे संतोष राऊत यांनी लाथा बुक्क्यानी मारहान करत तूला दोन दिवसात संपवतो अशी धमकी दिली.जखमी मुगडे हे गारगोटी च्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.या बाबतची फिर्याद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे तर यातील ९ जणावर भुदरगड पोलीसात गुंन्हा नोंद झाला आहे