ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड मधील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मुरगुड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाची सुरवात डॉ,राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी इयत्ता दहावीच्या मुलांनी शाळा चालवली ,विद्यार्थ्यांची यथोचित भाषणे ,समुहगान ,व संगीतखुर्ची असा विविधतेने नटलेला कार्यक्रम मुलांनी आयोजित केला होता .यावेळी समारोप समारंभात सर्व शिक्षकांचा भेटवस्तू व फुले देऊन सत्कार केला .व वंदेमातरम ने या कार्यक्रमाची सांगता झाली .
यावेळी ,जसमीन जमादार व ट्रीजा बारदेसकर यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले .