प्रभाग क्रमांक 55 पद्माराजे उद्यान वेताळ तालीम परिसरात 45 वर्षावरील नागरिकांना कोविडशिल्ड लसीचे शिबिर : नगरसेवक अजित राऊत

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 55 पद्माराजे उद्यान वेताळमाळ परिसरातील 45 वर्षावरील नागरिकांना कोविंड शील्ड या लसीचे शिबिर आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर.के पवार, नगरसेवक अजित राऊत,सुजित चव्हाण,महिपतराव पांडे यांच्या हस्ते झाले.तसेच मा. महापौर सुनिता अजित राऊत व नगरसेवक अजित राऊत यांच्या प्रयत्नातून हे शिबिर घेण्यात आले. 45 वर्षावरील नागरिकांना पहिला-दुसरा डोस देण्यात आला.
या शिबिरामध्ये 250 लोकांना लस देण्यात आली हे शिबिर घेण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग फिरंगाई हॉस्पिटल येथील केंद्रप्रमुख डॉक्टर योगिता भिसे, माया चोपडे,रुपाली जाधव आशा वर्कर,कल्याणी राऊत,सुनीता राऊत राधिका चव्हाण आणि कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करून नागरिकांना लस दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील, सुरेश पाटील, बाबुराव घाडगे, पंपू पावले, प्रभाकर नरके, सुधाकर पाटील, प्रभाकर मगदूम, गोपाळ राऊत (शेठ ), सम्राट राऊत, बजरंग देवकर, तुळशीदास राऊत नेते, प्रदीप आपराद, प्रथमेश राऊत, राजू मगदूम, संजय पडवळ,संजय कुडाळे, अनिल काटकर, सुहास साळुंखे उपस्थित होते.