ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मेघोली धरण : एक महिला बेपत्ता,वाहून गेलेले चौघे जण झाडावर सापडले; चार जनावरे मृत

कडगाव प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण फुटल्यामुळे चार युवक वाहून गेली असल्याची माहिती स्थानिकांकडून कळविण्यात आली होती.
पण सद्यस्थितीत एक महिला बेपत्ता असून वाहून गेलेले चौघे जण झाडावर सापडले असल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर चार जनावरे मृत झाल्याचे वृत्त आहे.