राजे बँकेस “बँको ब्ल्यू रिबन” पुरस्कार शाहू ग्रूप च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

कागल प्रतिनिधी :
येथील राजे विक्रमसिंह घाटगे बँकेस अविज पब्लिकेशन कोल्हापूर तर्फे टेक्नॉलॉजी विभागातील ,”बँको ब्ल्यू रिबन ” पुरस्कार प्रदान केला.म्हैसूर येथे झालेल्या समारभांत हा पुरस्कार खासदार प्रताप सिम्हा यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. राजे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार माळकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. बँकेला आज अखेर 20 इतके पुरस्कार मिळाले आहेत. आता हा 21 वा पुरस्कार आहे. त्यामुळे बँकेच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन एम पी पाटील म्हणाले शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वीपणे घोडदौड सुरू आहे. श्री घाटगे यांचे मार्गदर्शन, सभासद ठेवीदार यांचा विश्वास ,प्रशासनाचे योग्य नियोजन व कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळेच बॅंकेला हा पुरस्कार मिळाला आहे.
यावेळी बँक असोसिएशनचे अविनाश शिंत्रे ज्येष्ठ संचालक राजेंद्र जाधव, अप्पासो हूच्चे व रवींद्र घोरपडे उपस्थित होते.