राधानगरी महाविद्यालयात ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन; मराठी भाषा व रोजगाराची संधी या विषयावर साधला संवाद

कुडूत्री प्रतिनिधी :
राधानगरी महाविद्यालय राधानगरी व शिवाजी विद्यापीठ आणि सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय क्लस्टर काॅलेज अंतर्गत राधानगरी महाविद्यालयामध्ये मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली होती.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. वसंत ढेरे होते.
कार्यशाळेत प्रमुख वक्ते डाॅ.शिवाजीराव होडगे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय यांनी मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.मराठी विषयाने अनुवाद, वर्तमानपत्रे,इ.संकेतस्थळे, निवेदक इ. क्षेत्रात नोकरीच्या हमखास संधी आहेत. असे प्रतिपादन केले. प्र.प्राचार्य डाॅ.वसंत ढेरे यांनी अध्यक्षीय भाषण केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले. आभार प्रा.डॉ. कुलदीप पवार यांनी मांनले.लिड काॅलेजचे विद्यार्थ्यी, प्राध्यापक महाविद्यालयातील प्रा. के.वाय.एकल, एस.आर. सावंत,आर.के पाटील, अनिल कांबळे उपस्थित होते.