नेमबाजपटू राही सरनोबतचा शाहू ग्रुपतर्फे सत्कार

कागल प्रतिनिधी :
येथे आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू व कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिचा शाहू ग्रुप मार्फत शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला.क्रोएशिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देऊन टोकिया 2021 ऑलिंपिक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याबद्दल तिचा हा सत्कार केला.
2019 साली जर्मनी येथे 2008 साली पुणे येथील कॉमन गेम्स व 2018 साली जकार्ता येथे एशिया गेम्स मध्ये तिने सुवर्णपदक पटकावले आहे.याशिवाय विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा तिने विविध पदकांना गवसणी घातली आहे.नेमबाजीमधील या उज्वल कामगिरीबद्दल 2018 साली क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आले आहे . राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म व कर्मभूमीतील या सुवर्णकन्येचा शाहू ग्रुप मार्फत सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याशिवाय न्यूज १८ लोकमतचे कोल्हापूर प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांची टीव्ही ९ या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दिल्ली येथील चीफ ब्युरोपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार श्री घाटगे यांच्या हस्ते केला. यावे यावेळी राहीच्या मातोश्री सौ प्रभा जीवन सरनोबत,
भाऊ आदित्य सरनोबत, वहिनी धनश्री आणि इशिता देवी धैर्यसिंह मोहिते पाटील व वीरेंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी श्री घाटगे म्हणाले, राहीने नेमबाजीतील उज्वल कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. याचा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून माझ्यासह सर्वच कोल्हापूरकरांना सार्थ अभिमान आहे. या ऑलम्पिक मध्ये हुलकावणी दिलेल्या पदकासाठी तिला पुढील ऑलिम्पिकसाठी शाहू ग्रुपसह तमाम कोल्हापूरवासियांच्यावतीने शुभेच्छा. यासाठी ती घेत असलेले कष्ट व करत असलेली मेहनत पाहता या पदकाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले.
यावेळी राही सरनोबत म्हणाल्या, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी खेळाडूंना राजाश्रय दिला होता. त्यांच्या पश्चात शाहू कारखान्याचे संस्थापक व राजे विक्रमसिंह घाटगे यांनी खेळाडूंना राजाश्रय देण्याची सुरू केलेली परंपरा समरजितसिंह घाटगे पुढे चालवित आहेत.याचा आम्हा सर्व खेळाडूंना अभिमान आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमीत झालेला हा सत्कार माझ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद व पाठबळामुळेच मी 2024 ओलंपिक मध्ये पदक मिळवून संपूर्ण देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.