मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाचा अवमान शिवसैनिक कदापि खपवून घेणार नाही : जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

शिरोळ प्रतिनिधी : विनायक कदम
ऑगस्ट महिनाअखेरीस होणाऱ्या गोकुळच्या संचालक मंडळ बैठकीत जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नियुक्तीचा विषय निर्णयार्थ अजेंड्यावर घेण्याचे कार्यकारी संचालक घाणेकर यांचे लेखी पत्र..
शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. परंतु सदर नियुक्तीनंतर दीड महिन्याचा कालावधीत झालेल्या कोणत्याही संचालक मंडळ बैठकीत सदर आदेश विषयपत्रिकेवर घेतला नाही. त्याचबरोबर यासंबंधी शासनास पाठवायचे इतिवृत्तही सादर केलेले नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली धडक दिली व गोकुळ प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे यांचा आदेश असतानाही आपण सदर आदेशाची अंमलबजावणी अजूनही का केली नाही? आपल्यावर यासंबंधी कोणाचा दबाव आहे का? हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची गोकुळमध्ये अडचण होते आहे का? शासनाचा आदेश पालन न करणारे गोकुळ पाकिस्तानात आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून शिवसैनिकांनी गोकुळ कार्यालय परिसर दणाणून सोडला.
पद आणि सत्ता यापेक्षा आम्हाला शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य आहे. ठाकरे परिवार आमचे दैवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचा अवमान आम्ही शिवसैनिक कदापि खपवून घेणार नाही. दिलेल्या पत्राप्रमाणे आपण सदर आदेश संचालक मंडळ बैठकीत ठेवून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर हजारो शिवसैनिकांसह गोकुळमध्ये घुसून शिवसेना स्टाईलने उत्तर देवू, असा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील,साताप्पा भवान,महादेव गौड,नगरसेवक रवींद्र माने,तालुकाप्रमुख वैभव उगळे,आनंद शेट्टी,बाजीराव पाटील,दत्ता पोवार, बाबासो पाटील,बाबासाहेब सावगावे,संदीप पाटील,सयाजी चव्हाण,अमोल देशपांडे,दिपक यादव,आण्णासो बिलोरे,संदीप दबडे,प्रशांत कागले,नगरसेवक बाळासाहेब मुधाळे,हूपरीचे माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील,अर्जुन मुरलीधर जाधव,भरत मेथे,योगेश कुलकर्णी,भरत देसाई,बाजीराव आरडे,विजय जाधव,संताजी देसाई यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.!