ताज्या बातम्यामहाराष्ट्र
ब्रेकिंग : छगन भुजबळ यांची 100 कोटींची मालमत्ता जप्त ?

मुंबई ऑनलाईन:
ठाकरे सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे
सविस्तर प्रकरण ?
आयकर विभागाने मरीनड्राइव्हच्या अल-जबेरिया कोर्ट ही इमारत बेहिशोबी मालमत्ता म्हणून सील केली आहे. या इमारतीची बाजार भावानुसार किंमत १०० कोटी आहे.
ज्या कंपनीने या इमारतीची खरेदी केली होती. चौकशीत या कंपनीकडे इमारत खरेदी करण्याच्या अनुशंगानेन पुरेसे पैसेही नव्हते. या इमारतीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरूद्ध मनी लाँडरिंग प्रकणात ईडीने चौकशीही केली होती.
ईडीला महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसे या इमारतीच्या खरेदीसाठी वापरला असल्याचा संशय होता.या प्रकरणी व्यावसायिक अर्शद सिद्धीकी याच्या मार्फत हे पैसे गुंतवल्याचा संशय ईडीला होता. त्यानुसार ईडीने त्याचा जबाबही नोंदवला होता.