ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजऱ्याचे स. पो. नि. बालाजी भांगे यांना बदलीनिमित्त निरोप

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजरा तालुका पोलीस पाटील संघटनेचेमार्फत स पो नि बालाजी भांगे यांची बदली झालेने त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला संघटना अध्यक्ष, सचीव, पदाधिकारी तसेच महागोंड, दाभिल, सिरसंगी, साळगाव, ईटे, हाजगोळी चे तसेच इतर पोलीस पाटील पोलीस पाटील उपस्थित होते. श्री भांगे याना पुढील वाटचालीसाठी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
भविष्यात आम्हाला आपली कमी नक्कीच जाणवेल कारण आम्हाला मिळालेलं आपलं सहकार्य आम्ही पोलीस पाटील कधीच विसरू शकत नाही. पोलीस पाटलांच्या कोणत्याही अडचणी आपण किती सहज सोडविल्या आहात. आपलं मार्गदर्शन आम्हाला भविष्यात खूपच उपयोगी पडणार आहे, असे मत संघटनेने व्यक्त केले. यावेळी आजरा तालुका पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी व पोलिस पाटील हजर होते.