केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे गारगोटी येथे पडसाद; नारायण राणे यांच्या प्रतिमेचे भुदरगड शिवसैनिकांकडून दहन

गारगोटी प्रतिनधी :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भुदरगड तालुक्यात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुका शिवसेच्या वतीने राणेंचा निषेध केला. राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडे मारून दहन केले.
यावेळी शिवसेनापक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय असो, आवाज कोणाचा, शिवसेनेचा’, कोंबडीचोर नारायण राणे हाय हाय…’, शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार हे, शिवसेना विजय असो, च्या घोषणा देत शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांचा निषेध केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्राचार्य अर्जुन आबिटकर, माजी उपसभापती सुनिल निंबाळकर, मौनी विद्यापीठाचे संचालक बाजीराव चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, माजी उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रणधिर शिंदे, संग्रामसिंह सावंत, महादेव पाटील, तानाजी देसाई, अशोक दाभोळे, राजू चिले, अजित चौगले, नेताजी सारंग, भरत शेटके, प्रशांत भोई, पांडूरंग कांबळे, विद्याधर परीट, सागर मिसाळ, संदीप शिंदे, जितेंद्र भोसले, विशाल वायदंडे, शरद पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.