रशियातील कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळाल्याबद्दल पैलवान पृथ्वीराज पाटील चे शाहूवाडी – पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले अभिनंदन

कोल्हापुर, प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
रशिया येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करीत देवठाणे (ता. पन्हाळा) च्या पृथ्वीराज पाटील याने कांस्यपदकाची कमाई केली. त्यांचे आज वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी अभिनंदन करून भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या. पृथ्वीराज वारणा कुस्ती केंद्र येथेही सरावासाठी होता त्याचीही आठवण वारणा तालमीचे वस्ताद संदिप पाटील यांनी करून दिली.
पृथ्वीराज याने ९२ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करीत चुरशीच्या लढतीत रशियाच्या प्रतिस्पर्धी मल्लास २-१ असे गुणांवर हरवीत कांस्यपदकाची कमाई केली. तो सध्या शिंगणापुरातील शाहू कुस्ती केंद्रात जालिंदर मुंडे व माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शिवाजी पाटील, प्रशिक्षक सुनील फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील व धनाजी पाटील, वडील बाबासाहेब पाटील, आजोबा मारुती पाटील, वारणा तालमीचे वस्ताद संदिप पाटील यांचे त्याला सहकार्य व मार्गदर्शन लाभले.