वरदला न्याय द्या..आरोपीला फाशी द्या..निढोरीमध्ये निषेध सभा व जोडे मारो आंदोलन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी (ता.कागल) येथील मारूती वैद्य या आरोपीस फाशी झालीच पाहीजे, वरदला न्याय मिळालाच पाहीजे अशा घोषणा देत निढोरी येथे जाहीर निषेध सभा व जोडे मारो आंदोलन संपन्न झाले.प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक विकास सावंत यांनी केले.
महाराष्ट्र ही शिव,शाहु ,फुले आंबेडकरांची भुमी आहे.या राष्ट्राला वारकरी सांप्रदायचीही खुप मोठी परंपरा लाभलेली आहे .अशा या महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायातील क्रुरकर्मा मारुती वैद्य याने आपल्याच जवळच्या मित्राच्या निष्पाप मुलाचे अपहरण करुन खुन केलेला आहे.हे कृत्य मैत्रीच्या नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे.शाहुंच्या विचारांचा वारसा सांगणाय्रा कोल्हापुर जिल्ह्यासाठी ही घटना नक्कीच अशोभनिय व निषेधार्ह आहे असे कृत्य करणाय्रा नराधमाचा जलदगतीने तपास करून खुनाचा छडा लावावा.वरद पाटील व पीडीत कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.असं मत जोडे मारो आंदोलनात सहभागी ग्रामस्थांनी व्यक्त केले.
सदरचे खुन प्रकरण हे अंधश्रद्धेतुन झाले असल्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे जनजागृतीसाठी चष्मा फेका अंधश्रद्धेचा शोध लागे सत्याचा,अंद्धश्रद्धा नको श्रद्धा हवी,एका मांत्रिकाचा मंत्र जीवनाचे बिघडवितो तंत्र,शिक्षणाकडे वळा अंधश्रद्धेपासुन दुर पळा या प्रबोधनात्मक घोषणांनी कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमामध्ये वरद या छोट्या बाळाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रा.डाॅ प्रदिप कांबळे ,निढोरीचे सरपंच अमित पाटील, वाय.एस.कांबळे ,राम पोवार,पी.पी.प्रधान यांनी मनोगताव्दारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच विठ्ठल पाटिल, शामराव सावंत,सुनिल माने,संजय कांबळे,पांडुरंग सावंत,एस.डी.मगदुम,ओंकार कांबळे, मिलिंद देशपांडे,बी.एल.कांबळे,विश्वास पाटिल,सुधीर सुतार,प्रकाश सावंत,आनंदा रंडे,सुरज कांबळे, धीरज कांबळे,पवन माने, मनोज माने,सिद्धेश डवरी,पम्पु रंडे,विक्रम कांबळे,भैरू बुगडे,तुकाराम खेबुडे,विनायक मोरे, शंकर डवरी,विलासभाई कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.