ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरदच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्यावी : समरजितसिंह घाटगे यांची मागणी; रक्षाबंधन दिवशी बंधूप्रेमातून दिला त्या अभागी मातेस आधार

बिद्री प्रतिनिधी :

सोनाळी ता कागल येथील वरद पाटील या चिमुकल्याच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याच्या मारेकर्‍यास लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.

सोनाळी ता कागल येथे बेपत्ता असलेल्या वरद पाटील या लहान मुलाचा शुक्रवारी (ता.) 27 रोजी खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या पाटील कुटुंबीयांची श्री घाटगे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली.रक्षाबंधन सणाच्या दिवशी मयत वरदची आई पूनम यांना त्यांनी बंधूप्रेमातून आधार दिला. नराधम मारेक-यास फाशीची शिक्षा होईपर्यंत मी पाटील कुटुंबियांसह गावक-यांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे.असा आधार दिला.

यावेळी मयत वरदचे वडील रवींद्र यांनी राजे, मी त्याला फुलाप्रमाणे जपला होता.एक क्षणही नजरेआड करत नव्हतो.शाळेलासुद्धा मी स्वतः ने -आण करीत होतो. त्यांच्यावर काळाने असा कसा घाला घातला? असा आर्तपणे टाहो फोडला.त्यामुळे राजेना गहिवरून आले. त्यांच्यासह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. व काही क्षण वातावरण सुन्न झाले.पाटील कुटूंबियांसह गावकरीही अद्याप या धक्क्यातून सावरलेले नसून शोककळा पसरली आहे.

यावेळी अपत्य होत नसलेच्या नैराश्येतून नरबळीसारखा हा प्रकार असू शकतो,त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा. या धक्क्यातून न सावरलेल्या वरदच्या कुटुंबियांस पोलीस तपासासाठी बोलावीत आहेत. या स्थितीस कुटुंबियांची तशी मानसिकता नाही. त्यामुळे याबाबत पोलिसांशी आपण बोलावे. असे साकडे ग्रामस्थांनी श्री.घाटगे यांना घातले. त्यांनी तात्काळ पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या तपासाला वेगळी दिशा न देता नागरिकांच्या म्हणण्यानुसार खरच हा अंधश्रद्धेसारखा प्रकार असेल तर त्या दृष्टीने या प्रकरणाची चौकशी करावी व आरोपीस फाशीची शिक्षा देण्याच्या दृष्टीने तपास करावा अशा सूचना दिल्या. तसेच पोलिस अधीक्षकांशीही याबाबत आपण बोलून घेऊ असेही स्पष्ट केले.

यावेळी भूषण पाटील वाळवे खुर्द ,प्रताप पाटील सावर्डे बु ,सुखदेव चौगले ,समाधान म्हातुगडे , प्रवीण खोळांबे, बाळासाहेब तापेकर ,मधुकर भिउगडे ,दिग्विजय किल्लेदार उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks