जीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाटणवाडी येथे कृषिकन्येने शेतकऱ्यांना दिले आधुनिक शेतीचे धडे

सावरवाडी प्रतिनिधी : 

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय कराड येथील कृषिकन्या कु.अमृता कृष्णात पाटील हिने ग्रामीण  कृषि जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भाटणवाडी (  ता.करवीर ) गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण, बिजप्रक्रीया, एकात्मिक तण नियंत्रण, झाडांना खते देण्याच्या पद्धती, गोठा व जनावरांची योग्य ती काळजी आणि स्वच्छता, शेतकऱ्यांनी कर्ज मागणीचा अर्ज कसा भरावा, विविध किडीचे व्यवस्थापन, मोबाईल ॲपद्वारे आधुनिक शेतीकडे वाटचालीस होणारी मदत, फळझाडाची कलम बांधणी, दुग्ध पदार्थांची निर्मिती, फळांपासून पदार्थ निर्मिती ,अशी विविध प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शेतकरी महादेव पाटील, कृष्णात पाटील, रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, जयसिंग पाटील, सविता पाटील, संगिता पाटील, मनिषा पाटील, सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते.

कृषिकन्या कु. अमृता कृष्णात पाटील यांना सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर.आर.सुर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.आर. जुकटे, कार्यक्रम समन्वयक डॉ.धनंजय नावडकर , डॉ. आनंद चवई आदींचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks