गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र
सोनाळी हत्या प्रकरण : मारेकऱ्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वरदचा मारेकरी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य याला पाच दिवस पोलीस कोठडीचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शनिवारी दिले. चार दिवस बेपत्ता असलेल्या वरदचा मृतदेह सावर्डे बुद्रुक परिसरात शुक्रवारी सापडला वरदच्या वडिलांचा मित्र दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य या गावातीलच संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. स्वतःला पंधरा वर्षांपासून मूल होत नसल्याच्या नैराश्यातून मारुतीने हा खून केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी आरोपीने केलेल्या गुन्ह्यामागील कारण शोधण्यासाठी कस्टडीची मागणी केली. ती मंजूर करून २६ पर्यंत संशयिताला कोठडीत ठेवण्याचे आदेश कागलच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विजया काटकर यांनी दिले.