ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पानसरे हत्येचा तपास ए.टी.एस. कडे देण्याची मागणी

कोल्हापूर :
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी निर्घृण खुनी हल्ला करण्यात आला. या खून प्रकरणी महाराष्ट्र पोलीस दलाने एका मारेकऱ्यास अटक केली. पण त्याच्या इतर साथीदारांना व सूत्रधाराला पकडण्यात गेल्या साडेसहा वर्षांत पोलिसांना अपयश आले आहे. पानसरे खून प्रकरणी दाखल केलेले दोषारोपपत्र देखील अपूर्ण आहे. खुनातील एकमेव साक्षीदाराला धमकी दिली जात असून कोल्हापूर पोलीस काहीही कारवाई करत नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरील विश्वास उडालेला आहे, असा आरोप करीत आज भाकपच्या वतीने बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली.