सावर्डे दुमाला गावचे वारकरी संप्रदायातील आषाढ पायी दिंडी सोहळ्याचे मानाचे विणेकरी हभप शंकरराव पाटील यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथील वारकरी संप्रदायातील मानाचे विणेकरी हभप शंकरराव भाऊ पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले ते ९३ वर्षाचे होते ,
शेतकरी कुंटूबात दि १० मार्च १९२८ साली हभप शंकरराव पाटील यांचा जन्म झाला . आई आंबूबाई यांच्या पाठबळावर त्यांनी कुस्ती कला जोपासली होती . वयाच्या २५ व्या वर्षी लग्न झाले शाहीरी कला जोपासत वयाच्या ३० व्या वर्षी ते वारकरी संप्रदायातील भजनकलेकडे वळले आणि गावात वारकरी संप्रदाय सुरू केला . चांदे ते तिर्थक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे चोपदार म्हणून काम पाहिले . त्यानंतर त्यांनी वास्कर फडातील आळंदी ते पंढरपूर आषाढ पायी दिंडी सोहळ्यात दिंडी क्रमांक एक मध्ये वयाच्या ८७ वर्षापर्यत त्यांनी मानाचे वीणेकरी म्हणून कामगिरी बजावली होती .
पंचक्रोशीतील अनेक गावांच्या हरीनाम सप्ताह सोहळ्यात त्यांना विणेकरी म्हणून बहुमान मिळत असे पंढरपुरची चारही वाऱ्या ते करीत असे . त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली होती . गावातून टाळमृंदंगाच्या वातावरणात अंतयात्रा काढण्यात आली . तुळशी नदीच्या पवित्र भुमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात एक भाऊ , दोन मुलगे ,दोन मुली , सुना नातवंडे, पुतणे असा परिवार आहे .
….आणि आबांच्या निधनाने वारकरी संप्रदाय पोरखा झाला .
गेली पाच दशके वारकरी संप्रदायातील पायी दिंडी सोहळे, हरी नाम सप्ताह सोहळे , यामध्ये मानाचे विणेकरी म्हणून हभप शंकरराव पाटील यांना बहुमान होता. भाविक भक्त त्यांना आबा म्हणत असत . त्यांच्या वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे तुळशी खोऱ्यातील वारकरी संप्रदाय पोरखा झाला.