ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात मटका, जुगार तेजीत

कोल्हापूर प्रतिनिधी :
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कांडगाव (ता. करवीर) येथील शेडमध्ये छापा टाकून मटकाबुकी विजय पाटील याच्यासह 11 जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी रोख 40 हजार रुपयांसह देशी-विदेशी दारू, मोबाईल, दुचाकी असा सुमारे 3 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याचवेळी जयसिंगपूर येथील पाकिजा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळावर छापा टाकून 25 जणांना ताब्यात घेण्यात आले.जून आणि जुलै या दोन महिन्यांत पोलिस कारवाईतून 103 प्रकार उघडकीस आले असले, तरी अजूनही पिसणी सुरूच आहे.